महाराष्ट्रात कर्फ्यू: ...अन् अचानक दक्षिण नागपुरात 'ब्लॅक आऊट'
नागपूर: राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर शहर पोलिसांनी कठोर उपाययोजना आखल्या आहेत. मध्यरात्री नागपुरातील उड्डाणपुलांवरुन सर्वाधिक वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येताच उड्डाणपुलांच्या दोन्ही बाजूने कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील वर्दळ कमी झाली असली तरी रात्री ११.५३ वाजताच्या सुमारास दक्षिण नागपूरसह उपराजधानीतील सर्वच उड्डाणपुलांवर अचानक 'ब्लॅक आऊट' झाल्याने संभ्रम निर्माण झाला. नंदनवन परिसरासह सक्करदरा उड्डाणपुलावर झालेल्या या 'ब्लॅक आऊट'मुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून दिवे बंद करण्यात आले की अन्य कारणाने, हे मात्र वृत्त लिहिपर्यंत कळू शकले ।
लेबल: स्वास्थ्य
<< मुख्यपृष्ठ